मुंबई/प्रतिनिधी : बेरोजगारीच्या खाईत लोटल्या जाणा-या तरुणांना उद्योजक बनण्यासाठी राष्ट्रमित्र बहुउद्देशिय सामाजिक संस्थेने आधुनिक बंदिस्त शेळीपालन उद्योगाचे १ दिवसीय प्रशिक्षण, २९ नोव्हेंबर २०१५ रोजी गोवंडी येथे आयोजित केले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात पशू संवर्धन खात्याचे माजी उपायुक्त डॉ. गोविंदराव लोखंडे मार्गदर्शन करणार असून या उद्योगातून लाखो रुपये कसे कमवता येऊ शकतात हे सांगणार आहेत.
दिनांक २९ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्रशिक्षणाचा कालावधी आहे. त्याच दिवशी सकाळी ९ वाजता स्वामी रामकृष्ण परमहंस ज्युनिअर कॉलेज, बँक ऑफ बडोदाच्या वर, गोवंडी स्टेशन (पूर्व), मुंबई-८८. या वातानुकूलीत प्रशिक्षण स्थळी नोंदणी करून प्रवेश दिला जाईल. प्रवेश मर्यादित असल्यामुळे इच्छुकांनी अगोदरच ९८३३८९५७७५, ९९६७८९२४९७, किवा ७२१९२९७५९७ या क्रमांकावर अधिक माहिती घ्यावी व आपले नाव नोंदवून निराशा टाळावी. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी प्रमाणपत्र, उद्योगाची सखोल माहिती असलेली डीव्हीडी दिली जाणार असून प्रशिक्षणार्थींसाठी चहा व अल्पोपहार दिला जाणार आहे.
पारंपारिक शेळीपालनाला आधुनिकतेची जोड देऊन शेळीपालन हा जोडधंदा न राहता तो मुख्य उद्योग होऊ शकतो. याची आज ब-याच लोकांना कल्पना ही नाही. सामान्य माणसाला शेळीपालन, उद्योगाच्या नजरेतून पाहण्याची दृष्टीदेणारे हे प्रशिक्षण ठरणार आहे.
शेळीपालनाचे मोठ्या उद्योगात रुपांतर कसे करावे? समाजात असलेले गैरसमज? त्यांचे आजार कोणते? आजारापासून त्यांचे रक्षण कसे करावे? आजार झाल्यास त्यांना कोणते औषधोपचार करावेत? तांत्रीक व्यवस्थापन कसे करावे? गोठा कसा असावा? दुधासाठी कोणत्या जाती? मासासाठी कोणत्या जाती? उद्योगासाठी कोणत्या जाती फायदेशिर? पौष्टीक चारा कोणता? मातीशिवाय चार कसा उगवता येऊ शकतो? या उद्योगाचे अर्थकारण काय? या व अशा अनेक बाबींची इत्यंभूत माहिती या प्रशिक्षण कार्यक्रमात दिली जाणार आहे.
आपला सहकार्यभिलाषी
गणेश ठोंबरे
प्रकल्प संचालक
९८३३८९५७७५

No comments:
Post a Comment